शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

स्मशानभूमीत तेरवीला १३ महावृक्षांचे केले रोपण!

By admin | Published: July 17, 2017 1:48 AM

युवकांचा पुढाकार बघून ग्रामपंचायत प्रशासन लागले कामाला

ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम: येथील मामा-भाचा यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली होती. सर्व विधी आटोपल्यावर शेळके व गावंडे कुटुंबीयांनी तेरवीच्या कार्यक्रमाला बगल देत येथील समस्याग्रस्त स्मशानभूमीत १६ जुलै रोजी तेरवीला तेरा महावृक्षांचे रोपण करून दोन बसण्यासाठी सिमेंट बाक दिले. दु:ख बाजूला सारून वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाचे महत्त्व दर्शविणारा एक आदर्श उपक्रम त्यांनी निर्माण केला. सुधाकर धोंडूबा शेळके व विकास रामेश्वर गावंडे या मामा-भाचा यांचे निधन मंगळवार ४ जुलैला झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता स्मशानभूमीची दुरवस्था पाहून शेळके, गावंडे, कुटुंबासह युवक व गावकरी यांनी सदर स्मशानभूमीची साफसफाई करण्याचे ठरविले होते. त्यानुसार साफसफाई करून मुरूम टाकून जेसीबीच्या साहाय्याने लेव्हल करून घेतली. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत आणखी मुरूम टाकला व लेव्हल केली. तसेच शेडचे फुटलेली टिनपत्रे बदलून नवे टिनपत्रे बसवून घेतले. त्यानंतर १६ जुलै रोजी शेळके व गावंडे कुटुंबीयांनी सुधाकर शेळके व विकास गावंडे यांच्या तेरवीच्या कार्यक्रमाला बगल देऊन दु:खाला आवरून स्मशानभूमीत वड, पिंपळ, बदाम, उंबर, सप्तपर्णी अशा १३ महावृक्षांची लागवड मान्यवर व कुटुंबीयांच्या हस्ते केली. दु:ख सावरून वृक्षारोपण करण्याचा हा उपक्रम सर्वांसाठी एक आदर्श ठरत आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाला विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, मुंगशिदेव डाखोरे, अनंत शेळके, मोहन काकडे, भीमराव शेळके, मनोहर गिऱ्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामोधर गारोळे, माजी उपसरपंच मालता वडतकर, मधुकर शेळके, नामदेव शेळके, अरुण गावंडे, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, विशाल शेळके, पवन शेळके, शिवानंद शेळके, उमेश शेळके, सदानंद शेळके यासह अनेक मान्यवर उपििस्थत होते. महिलांसमोर निर्माण केला आदर्शपती व भाचा यांचे एकाच दिवशी निधन झाल्याने स्वर्गवासी सुधाकर शेळके यांच्या पत्नी सुनंदाबाई यांनीसुद्धा दु:ख बाजूला ठेवून पर्यावरणाप्रती आपली सकारात्मक भूमिका निभावत वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारून महिलांसमोर आदर्श उभा केला आहे.