शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

अमरावती येथील धान्य ठेकेदार सहआरोपी

By admin | Published: June 30, 2017 12:32 AM

रेशनाचा तांदूळ अफरातफर प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: गत २२ जून रोजी येथून जवळच असलेल्या शेलूद येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेने काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडल्यानंतर या प्रकरणात चिखली पोलिसांनी ट्रकचालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान धान्य वाहतुकीचे जिल्ह्याचे ठेकेदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट अमरावतीचे मालक पन्नालाल गुप्ता हेदेखील दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात या ठेकेदारास सहआरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा शासकीय वितरण प्रणालीचा सुमारे ४० हजार रुपयांचा ३५० कट्टे तांदूळ व सदर रेशनचा माल वाहून नेणारा ट्रक शेलूद येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेने चिखली पोलिसांनी पकडला २२ जून रोजी पडकला होता. याप्रकरणी चिखली तहसील कार्यालयातील निरीक्षण अधिकारी अजित शेलार यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक शब्बीर खान बुढन खान वय ४७ वर्षे व ट्रकमालक अब्दुल रफीक अब्दुल रहेमान रा. देऊळघाट यांच्याविरुद्ध गुन्हा करण्यात येऊन आरोपी करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य वाहतुकीचे बुलडाणा जिल्ह्याचे ठेकेदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट अमरावतीचे मालक प्रो.प्रा. पन्नालाल चोखेलाल गुप्ता, रा. शारदा नगर, बडनेरा रोड अमरावती हे दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्ह्यात सहआरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. पुढील तपास बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार महेंद्र देशमुख, पोउपनी प्रल्हाद मदन, पोहेकॉ नारायण तायडे, कैलास जाधव, नापोका राजू सोनोने, पोकॉ शिवानंद तांबेकर करीत आहेत.