लसीकरण केंद्रावर लागतात रांगा
बुलडाणा : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करण्यास नागरिकांनी प्राथमिकता दिली आहे. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी वैतागले आहेत. तर दुसरीकडे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.
सेवानगर ठरताेय काेराेनाचा हाॅट स्पाॅट
अंढेरा : येथून जवळच असलेल्या सेवानगर येथे तब्बल २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले हाेते. त्यामुळे हे गाव कोरोनासाठी हॉट स्पॉट ठरत असल्याचे दिसून येत आहे. अंढेरा ग्रामपंचायतसह आरोग्य विभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
साेनाेशी ग्रा.पं.च्या वतीने सॅनिटायझरचे वाटप
सिंदखेड राजा : तालुक्यातील सोनोशी ग्रामपंचायतीने गावात विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. आतापर्यंत तीन वेळा गावात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी गावकऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे
बिबी येथे ५६ युवकांचे रक्तदान
बिबी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता संसर्ग पाहता व पुढील महिन्यात रक्ताचा तुटवडा भास नये, या उद्देशाने येथील युवकांनी पुढाकार घेऊन ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५६ युवकांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला आहे.
धरणाचे पाणी साेडल्याने दिलासा
देऊळगाव मही : देऊळगाव राजा तालुक्यासह सिंदखेड राजा व लोणार तालुक्यातील नदीकाठच्या गावांसाठी संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे, नदीकाठावरील गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
मेहकरात ७० युवकांनी केले रक्तदान
मेहकर : सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे. ऑक्सिजन, इंजेक्शन यासह इतरही आरोग्यविषयक सुविधांची कमतरता भासत आहे. अनेक लहान मोठ्या हॉस्पिटलमध्ये रक्ताचा पुरवठाही कमी होताना दिसत आहे. त्यामुळे मेहकर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ७० जणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.
काेराेना काळात बाेगस डाॅक्टर सक्रिय
बुलडाणा : ग्रामीण भागात गत काही दिवसापासून काेराेनाचा कहर सुरू आहे. घराघरात रुग्ण आढळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याचा लाभ काही बाेगस डाॅक्टर घेत असल्याचे चित्र आहे.
लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम रखडले
बुलडाणा : अनुदानासह इतर कारणांनी घरकुलांचे बांधकाम रखडल्याचे चित्र आहे. बांधकाम साहित्याचे दर माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच अनुदानही रखडल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे रखडली आहेत.