आगामी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या बिगुल वाजताच गावपातळीवरील राजकीय पुढारी मंडळी आपलाच सरपंच होणार या यासाठी आपापले पॅनल उभारत आहे. जिवाची पराकाष्ठा करून मोर्चे बांधणीच्या तयारीला लागले आहे. ग्रामीण भागात निवडणुकीची धामधूम आतापासूनच सुरू झाली आहे. बुलडाणा तालुक्यातील धामणगाव येथे सध्या निवडणुकीचा माहोल बनला आहे. गावागावात नवसे गवसे निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले आहे. धामणगाव येथील सरपंच पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले हाेते. त्यामुळे अनेकांना धक्का बसला हाेता. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण आता रद्द झाल्याने सर्वच जण पॅनल करून निवडणुकीची तयारी करीत आहेत. निवडणुक जिंकण्यासाठी काय डाव आखले पाहिजेत याचीच चर्चा चहा टपरीवर, बसस्टाॅपवर, पारावर बसून युवावर्ग करीत आहे. अनेक वर्ष संधी उपलब्ध नाही, आता मात्र संधीचे सोने केले पाहिजे, अशी संधी मिळणार नाही या उद्देशाने अनेकांनी कंबर कसली आहे. युवकवर्गही रिंगणात उतरणार असल्याने प्रस्थापितांसमाेर आव्हान राहणार आहे. निवडणूक आणि निकाल दाेन्ही नवीन वर्षांतच हाेणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:27 AM