जागदरी येथील ग्राम पंचायत कर्मचारी बद्री एकनाथ उगलमूगले हे कामावर असतांना गावातील व्यक्तीने मारहाण करून जखमी केले .त्या निषेधार्थ ९ मार्च रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सिंदखेडराजा तालुक्याच्या वतीने आरोपी विरुध्द शासकीय कामात अडथळा आनल्या प्रकरणी गून्हा दाखल करण्यात यावा. या बाबत ठाणेदार जितेंद्र आडोळे साखरखेर्डा यांना तालूका ग्रामपंचायत कर्मचारी यूनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले. ठाणेदार आडोळे यांनी सदरहू आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे सिनखेडराजा तालुका अध्यक्ष किसन अवसरमोल,उपाध्यक्ष भिमराव राठोड, सचिव भरत सूपेकर,सहसचिव केशव मूंढे कल्याण आढाव, श्रिराम दराडे,शेषराव मेरत इ तालूका यूनियन चे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:34 AM