धामणगाव बढे : निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून त्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन धामणगाव बढे ग्रामपंचायत सदस्य मनीषा सचिन मोदे यांनी केले आहे. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच गावकऱ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून प्रत्येक घरातील कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी उपलब्ध केली आहे़
या कचरा वाहक गाडीच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. घरात जमा होणारा कचरा नाल्यामध्ये न टाकता दररोज घंटागाडीमध्ये टाकावा़ त्यामुळे गाव स्वच्छ होण्यास मदत होईल. गावकऱ्यांच्या आरोग्यास सुद्धा धोका निर्माण होणार नाही . तसेच ग्रामपंचायतीच्या प्रयत्नास बळ मिळेल असे यावेळी मनीषा मोदे यांनी बोलताना सांगितले. यावेळी प्रामुख्याने अलीम कुरेशी, उपसरपंच श्याम निमखेडे, हारुण खासाब, बिस्मिल्ला कुरेशी, माजी सरपंच व सदस्य भागवत दराखे, किशोर मोदे, गजानन घोंगडे, ग्रामसेवक मोरे, वसीम कुरेशी ,धनराज घोंगडे ,अजित मोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओम बोर्डे तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.