किनगाव राजा पोलिसांसोबत ग्रामपंचायत, महसूल यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदविला आहे. काही दुकानदार ही शासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंध न मानता सेटर बंद करून आपले ग्राहक करत आहेत. त्यामुळे पोलीस, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संबंधित सर्व दुकानदारांना सूचना देऊन दुकाने बंद केली. नियमाचे पालन न करणाऱ्या व रस्त्यावर थांबणाऱ्या लोकांना योग्य समज देण्यात आला. त्याच बरोबर ग्रामपंचायत सचिव व कर्मचारी यांनी चार ते पाच लोकांना दंड केला. ग्रामपंचायतीचे सचिव चौधरी यांना किती लोकांना दंड केला, याबद्दल माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. या दंडाच्या वसूल केलेल्या रकमेबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी किनगाव राजा पोलीस कर्मचारी, प्रकाश सांगले, तोफिक शेख, ग्रामपंचायत सदस्य अशोक गुंजाळ, जगताप, प्रवीण गीते, सचिन मखमले, ग्रामपंचायत सचिव चौधरी आदी उपस्थित होते.
पोलिसांसह ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:33 AM