- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कडक निर्बंधामुळे निराधारांवर आर्थिक संकट येऊ नये यासाठी राज्य शासनाने एप्रिल आणि मे महिन्याचे मानधन देण्याची घाेषणा केली हाेती़. महसूल प्रशासनाच्यावतीने निराधारांचे अनुदानही बँकांमध्ये जमा करण्यात आले आहे़. मात्र, कडक निर्बंधामुळे हे अनुदान बँकांतच पडून असल्याचे चित्र आहे़. जिल्ह्यातील २़ १७ लाख लाभार्थ्यांना ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचे वितरण महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे़ . जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून बँकांना केवळ ऑनलाईन सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे़. कडक निर्बंधाच्या काळात निराधारांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल आणि मे महिन्याचे अनुदान एकत्र देण्याची घाेषणा केली हाेती़. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख १७ हजार ९६० लाभार्थ्यांसाठी ३४ काेटी ५६ लाख ३७ हजार ६२४ रुपयांचा धनादेश बॅंकामध्ये महसूल विभागाच्या वतीने देण्यात आला आहे़. धनादेश देण्याची कारवाई मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली़. त्यानंतर बँकांना सुट्या हाेत्या तसेच बुलडाणा जिल्हा प्रशासनाच्या वतीने ९ मे राेजी आदेश काढून कडक निर्बंध लागू केले़.
एटीएम नसल्याने अडचण जिल्ह्यातील अनेक निराधार लाभार्थ्यांकडे एटीएम नसल्याने त्यांची अडचण हाेत असली तरी अनेक निराधार निरक्षर असल्याने त्यांना पैसे काढता येत नाही़. त्यामुळे बुलडाणा शहरासह जिल्हाभरातील बँकांमध्ये निराधार गर्दी करतात़ आता बँकांचे व्यवहारच बंद असल्याने पैसे कसे काढावे,असा प्रश्न निराधारांना पडला आहे़ .