श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० डिसेंबर रोजी संस्थेच्या चिखली एम.आय.डी.सी.स्थित धान्य गोदामध्ये पार पडली. शासनाद्वारे कोरोना संदर्भात घालून देण्यात आलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करीत संपन्न झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. विजय कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशबुबा जवंजाळ, संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंत भवर, संचालक प्रेमराज भाला, श्रीराम कुटे, सुरेंद्रप्रसाद पांडे, पांडुरंग उरसाल, मधुसूदन लढ्ढा, कैलास व्यास, भगवान नागवाणी, लुनकरण डागा, अशोक कोटेचा, संध्या माहेश्वरी, विवेक महाजन, शुभांगी इरतकर, अर्चना पांडे, शंकर भालेराव, गजानन पवार यांचा समावेश होता. सूत्रसंचालन संचालक सुरेंद्रप्रसाद पांडे यांनी केले तर आभार शंकर भालेराव यांनी मानले. आमसभेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कर्मचारीवृंदानी परिश्रम घेतले.
शाखा विस्तार लवकरच!
श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेटच्या सद्य:स्थितीत ४१ शाखा कोअर बँकिंगद्वारे कार्यान्वित आहेत. तर सुमारे २५० कर्मचारी कार्यरत आहेत. लवकरच संस्थेच्या नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड. कोठारी यांनी दिली. (बिझनेस न्यूज)