शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मोठी देवीला श्रध्देचा निरोप ; खामगावात ऐतिहासिक शांती महोत्सवाची  सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 13:39 IST

विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  संपूर्ण देशात  एकमेव खामगाव शहरात भक्तीभावाने साजरा केल्या जाणाºया शांती महोत्सवाची बुधवारी सांगता झाली. यावेळी हजारो  भाविकांनी मानाच्या मोठी देवीला श्रध्देचा निरोप दिला. विसर्जनापूर्वी मोठी देवीची शहराच्या विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. खामगाव शहरात यावर्षी कोजागिरी पौणिमेच्या दिवशी म्हणजेच १३  आॅक्टोबर रोजी शांती महोत्सवाला सुरूवात झाली होती. शहरातील जगदंबा रोड भागात सार्वजनिक मोठी देवी जगदंबा नवरात्रोत्सव मंडळासोबतच विविध मंडळांनी मोठी देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती. दरम्यान, दहा दिवसांच्या पूर्जा अर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी शांती उत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी मोठी देवी जवळ होम हवन करण्यात आले. त्यानंतर बुधवारी शांती महोत्सवाची सांगता झाली. दुपारी १ वाजताच्या दरम्यान, जलालपुरा भागातून मोठी देवीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. जगदंबा रोड, मेनरोड, गांधी चौक, अकोला बाजार, जनता बँक, परत जगदंबा रोड, भुसावळ चौक, मोठा पुल मार्गे दुपारी  ३ वाजता ही मिरवणूक सतीफैलात पोहोचली.  याठिकाणी मोठी देवीची सामुहिक आरती करण्यात आली. काही वेळाच्या विसाव्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मोठी देवीच्या मिरवणुकीला पुन्हा सुरूवात झाली. ठक्कर आॅईल मिल, शिवाजी नगर, मोठा पुल, सरकी लाईन, मेनरोड, फरशी, सराफा पोस्ट आॅफीस, राणा गेट जवळून पुरवार गल्ली, शिवाजी वेस, सत्यनारायण मंदीर, घाटपुरी नाका, छोटी देवी मंदीर, जगदंबा संस्थान मार्गे घाटपुरी नदीच्या पुलापर्यंत पोहचून तेथून बायपास मार्गे उशिरा रात्री जनुना तलाव येथे  देवीचे विसर्जन करण्यात आले.

 भाविकांची अलोट गर्दी!

ग्रामदैवत असलेल्या आई जगदंबेला (मोठी देवी) श्रध्देचा निरोप देण्यासाठी खामगाव आणि परिसरातील भाविकांची मोठी गर्दी जमली होती. दुपारी १२ वाजता जलालपुºयात सामुहिक आरती करण्यात आली. त्यानंतर मोठी देवीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. यावेळी ठिकठिकाणी भाविकांना चहा, नास्ता आणि फराळाचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा