चिखली उपविभागात सद्य:स्थितीत ११२ गावे जोडलेली असून ग्राहक संख्या ७८ हजार ६४४ आहे. १२ उपकेंद्र आणि विस्तारित विद्युत वाहिन्या व रोहित्रे मोठ्या संख्येने आहेत. त्याचप्रमाणे भौगोलिक स्थिती व अंतराचा विचार करता चिखली उपविभागांतर्गत कृषी प्रभावित व सिंचन क्षमता जास्त प्रमाणात, खेड्यांचा विस्तार जवळपास २० ते २५ अंतराचा आहे. नवीन विभाजनामुळे खेड्यांची संख्या कमी होऊन वीज ग्राहकांना वेळेत सुविधा पुरविणे, नवीन वीज कनेक्शन त्वरित देणे, वीज गळती कमी करणे, वीज चोरीचे प्रमाण कमी होऊन कंपनीच्या महसुलात वाढ आदींसाठी उंद्री येथे नवीन उपविभागाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी राहुल बोंद्रे यांनी १५ जून रोजी ना. राऊत यांच्याकडे केली होती. याची दखल घेत ना.राऊत यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश महावितरण अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंत्यांना दिले आहेत.
उंद्री महावितरण उपविभाग निर्मितीला हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:41 AM