चक्रधर स्वामी यांच्या जयंती महोत्सवावर कोरोनाचे सावट
बुलडाणा : परमेश्वर अवताराची संकल्पना मांडणारे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन ८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रात फिरताना बुलडाणा जिल्ह्यातही आपले कार्य केले. त्यांच्या अवतार दिनानिमित्त बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील पाच ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षी काेराेनामुळे महाेत्सवानिमित्त हाेणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे़
मासरूळ येथे शिबिरात ५०० लसींचा टप्पा पार
मासरूळ : आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनातून आतापर्यंत मासरूळ येथे ५०० लसींचा टप्पा पार पडला आहे. दरम्यान, लसीकरणासाठी गावातील नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने व ग्रामपंचायत प्रशासनाच्या पुढाकाराने मासरूळ येथे ४ सप्टेंबर रोजी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. आतापर्यंत जवळपास ५०० लसींचा टप्पा पार पडला आहे.