चिखली : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त, चिखली काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात १३० जणांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केले.
सद्यस्थितीत राज्यात रक्ताच्या तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात १४ एप्रिल रोजी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. स्थानिक जयस्तंभ चाैकातील जनसेवा कार्यालयात पार पडलेल्या या शिबिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त १३० जणांनी रक्तदान केले. औरंगाबाद येथील लोकमान्य ब्लड बँक व जीवनधारा बुलडाणा अर्बन ब्लड सेंटरच्या चमूने रक्तसंकलन केले. यावेळी राहुल बोंद्रे, तालुकाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी व युकाँचे पप्पू जागृत, प्रकाश बोंद्रे, दीपक देशमाने, ज्ञानेश्वर सुरूशे, रा कॉ शहराध्यक्ष रवि तोडकर, शतंनू बोंद्रे, निलेश अंजनकर, डॉ. इसरार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महामानवास अभिवादन
काँग्रेसच्या रक्तदान शिबिरापूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी स्थानिक फुले-शाहू-आंबेडकर वाटिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रदीप पचेरवाल, विजय गाडेकर, हाजी राउफ, अमिनखॉ उस्मानखॉ, विजय जागृत, किशोर सोळंकी, गजानन गायकवाड आदी उपस्थित होते.