बुलडाणा : स्थानिक आझाद हिंद संघटनेच्या संपर्क कार्यालयात दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी कविवर्य भगवान ठग यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आझाद हिंद संघटनेकडून करण्यात आले होते.
कविवर्य भगवान ठग यांच्या स्मृतींना तेवत ठेवण्याचे कार्य आझाद हिंद संघटना सातत्याने करत असून, नि:स्वार्थ साहित्यिकांचा सन्मान म्हणजे निकोप समाज निर्मितीचीच नांदी आहे, असे मत यावेळी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांनी व्यक्त केले. सर्वप्रथम सामूहिक पुष्प अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी राजेंद्र काळे, साहित्यिक सुरेश साबळे, रवींद्र साळवे, किसान ब्रिगेडचे प्रदेश महासचिव ॲड. सतीशचंद्र रोठे, आझाद हिंद संघटनेचे प्रदेश महासचिव संजय एंडोले, आझाद हिंद महिला संघटनेच्या प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखा निकाळजे तसेच आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण कोकाटे, नारायण भाकरे, माई कोकाटे, सचिन पिंगळे, सुनील जाधव, शाहीर सिंधूताई अहिरे, संगीता मोराळे उपस्थित होत्या.