लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावमही : स्थानिक सोलापूर-मलकापूर राज्यमहामार्गावरील शिवाजी विद्यालय परिसरात असलेल्या किराणा दुकान फोडून १० हजाराचा माल लंपास झाल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. यावेळी दुकानात असलेल्या सिसीकॅमेऱ्यात चोर कौद झाला आहे.देऊळगाव मही येथील सोलापूर-मलकापूर राज्यमहामार्गावरील शिवाजी विद्यालय परिसरात विजय श्रीराम शिंगणे यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी १ जुलै रोजी रात्री ९ वाजता किराणा दुकान बंद केले. दरम्यान एका अज्ञात चोरट्याने दुकानाच्या छतावरील पत्रा तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच जवळपास १० हजाराचा किराणा माल लंपास केला. सदर घटना २ जुलै रोजी सकाळी दुकान उघडल्यानंतर विजय शिंगणे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित भाऊ संदीप यास माहिती देवून दुकानात लावण्यात आलेले सिसीकॅमेऱ्यात पाहण्यास सांगितले. यावेळी सदर अज्ञात चोरट्याने दुकानावरील पत्रा तोडून आत प्रवेश केल्यानंतर प्रथम सिसी कॅमेऱ्यासमोर पाकिट आडवे लावले. मात्र काही वेळानंतर कॅमेऱ्यासमोर लावण्यात आलेले पाकिट खाली पडले. त्यामुळे चोरीच्या घटनेचे चित्रक कॅमेऱ्यात आले. याबाबत विजय शिंगणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द ४६१,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस चौकीचे अकील काझी, इंगळे, बालोद, काकडेकरीत आहेत. तसेच परिसरातून एक मोटारसायकल चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे चोरट्यास अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
किराणा दुकान फोडले, १० हजाराचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2017 8:01 PM