नवीन मोदे। लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे: जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणार्या अधिकार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान केले. ऐरवी टॅक्सची फाइल घेऊन वावरणार्या या अधिकारी वर्गाने थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले.खामगाव येथील तरुणाई फाऊंडेशनची चमूही १४ एप्रिल रोजी सिंदखेड येथे श्रमदान करण्यासाठी सकाळी सिंदखेड येथे पोहोचली. त्यांच्या सोबत जीएसटीचे अधिकारीही होते. दरम्यान, सिंदखेड हे मोताळा तालुक्यातील गाव वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेले आहे. त्यात मोठे अधिकारीही सहभागी होत असून, ग्रामस्थही श्रमदान करीत आहेत.जीएसटीचे डेप्युटी कमिशनर टी. के. पाचरणे, त्यांची पत्नी साधना आणि मुलेही तळपत्या उन्हात सिंदखेड येथे या श्रमदान सहभागी झाले. त्यांच्या सोबत महिला अधिकारी कुम्बरे, तरुणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण विठोरे, राजेंद्र कोल्हे, उमाकांत कांडेकर, गोपाल पवार, अमोल तायडे सहभागी झाले होते. श्रमदानस्थळी पाण्याचे महत्त्व विशद करणारी पाण्याच्या थेंबाची मोठी रांगोळी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १ एकर जागेमध्ये राजू कोल्हे यांनी काढली. श्रमदानस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गोरोबा काका यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. -
‘वॉटर कप’ स्पर्धेसाठी ‘जीएसटी’ अधिकार्यांनी हाती घेतली कुदळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:01 AM
धामणगाव बढे: जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्यांसह सर्वसामान्यांमध्ये धडकी भरविणार्या अधिकार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान केले. ऐरवी टॅक्सची फाइल घेऊन वावरणार्या या अधिकारी वर्गाने थेट हातात कुदळ घेऊन श्रमदान केले.
ठळक मुद्देसिंदखेडमध्ये परिवारासह केले श्रमदान अनोख्या पद्धतीने साजरी केली आंबेडकर जयंती