शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

‘जीएसटी’मुळे कर चोरीला आळा बसेल!

By admin | Published: June 01, 2017 12:00 AM

लोकमत परिचर्चेतील सूर : कर प्रणालीत सुसूत्रता येईल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : देशात लवकरच जीएसटी कर प्रणाली लागू होणार आहे. जीएसटी कर प्रणालीमुळे सुसूत्रता येणार असून, शासनाच्या महसूलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन देशातील विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. या कर प्रणालीचा व्यापारी व सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे, असा सूर बुधवारी जीएसटी कर प्रणालीमुळे व्यापारी, जनतेला फायदा होणार की तोटा? या विषयावर आयोजित परिचर्चेत उमटला. देशातील विविध राज्यात विविध प्रकारच्या करांमुळे सारख्या वस्तूच्या किमती कमी-जास्त दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी वस्तूच्या वाहतूक खर्च लागून वस्तूच्या किमतीवर कर आकारण्यात येतो. त्यामुळे प्रत्येक राज्यात एकाच वस्तूच्या किमतीमध्ये फरक दिसून येतो. याशिवाय अनेक व्यापारी वस्तू विक्री कमी दाखवून कर चोरी करीत असल्याचे दिसून येते. त्याचा फटका शासनाला मोठ्या प्रमाणात बसतो. कर चोरीमुळे अनेकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतो. अशा प्रकारची कर चोरी होऊ नये, देशातील विविध राज्यात वस्तूचे भाव समान असावे, सर्वसामान्य जनतेला राज्यानुसार विविध किमती लागू करण्यात येऊ नये, तसेच शासनाच्या महसूलमध्ये भर पडावी, या उद्देशाने यूपीए सरकारच्या काळात जीएसटी कर प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वेळोवेळी विविध मान्यवरांनी सुचविलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून जीएसटी विधानसभेत सादर करून एक मताने मंजूर करण्यात आले. या जीएसटी कर प्रणालीमुळे एकसूत्रता येणार असून, त्याचा सर्वांना फायदा होईल, अशा प्रतिक्रिया सहभागी मान्यवरांनी व्यक्त केल्या. यापूर्वीही जनता कर भरत होती. यानंतरही जनता कर भरणार आहे. जीएसटीमुळे कर प्रणालीच्या पद्धतीत बदल झाला आहे. या कर प्रणालीमुळे जनता किंवा व्यापाऱ्यांना कोणताही फायदा किंवा तोटा होणार नाही. फक्त कर प्रणालीत बदल होईल; मात्र जे व्यापारी कर चोरी करत होते, त्या प्रकाराला आळा बसणार आहे. कर प्रणालीत सुसूत्रता आल्यामुळे एखाद्या वस्तूचे उत्पादन झाल्यास त्यांची नोंद होऊन त्याचा कर विक्रीपूर्वीच सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहे. त्यामुळे सरकारचा फायदा होईल.-नामदेवराव जाधव, शेतकरी नेते, बुलडाणा.देशातील ८० टक्के जनता टॅक्स संबंधित अज्ञानी आहे. त्यामध्ये सूत्रता नसणे हे एक कारण आहे. विविध राज्यात विविध वस्तूंवर विविध कर लावण्यात येतात. त्यामुळे करासंबंधी एकसूत्रता दिसून येत नाही. त्यामुळे वस्तूचे भाव विविध राज्यात कमी-जास्त असतात. आता मात्र जीएसटीमुळे संपूर्ण देशात एक कर प्रणाली लागू होईल. त्यामुळे कर व्यवस्था मजबूत होईल. त्यामुळे संपूर्ण देशात एकाच वस्तूवर सारख्या प्रमाणात कर घेण्यात येईल. त्याचा फायदा सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग सर्वांना होईल. - दीपक गोरे, बुलडाणा.जीएसटी कर प्रणालीमुळे सरकारकडे जास्तीत जास्त कर जमा होऊन विकास कामे होतील, अशी शासनाची अपेक्षा आहे; मात्र जीएसटी कर प्रणालीची अंमलबजावणी कशी होते, यावर त्याचे यश अवलंबून आहे, तर व्यापाऱ्यांसाठी ५० लाखाचा व्यवहार असलेल्यांना प्रत्येक महिन्यात हिशेब द्यावा लागणार आहे. तर ५० लाख पेक्षा जास्त व्यवहार असलेल्या व्यापाऱ्यांना प्रत्येक आठवड्यात हिशेब द्यावा लागणार आहे. ही पद्धत कंटाळवाणी आहे. त्यामुळे सदर कर प्रणाली यशस्वी होते का ? याबाबत संशय व्यक्त होत आहे. यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. - अ‍ॅड. विजय सावळे,बुलडाणा.जीएसटी कर प्रणालीचा कमी कालावधीसाठी फायदा नसला, तरी जास्त कालावधीकरिता फायदा होऊ शकतो. सदर कर प्रणाली लागू केल्यास सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यापर्यंत माल उपलब्ध होणार नाही; परंतु जीएसटी कर प्रणालीत सुसूत्रता निर्माण झाल्यास त्याचा व्यापारी व सर्वसामान्य जनतेला फायदा होऊ शकतो. जीएसटी कर प्रणालीमुळे काही प्रमाणात कर चोरीला आळा बसू शकतो; मात्र वस्तू उत्पादन व वाहतूक खर्च या दोघांवर कर लागू होत असल्यामुळे वस्तूच्या किमती वाढू शकतात. यासाठी वस्तू उत्पादनावर कर लागू केल्यास वस्तूच्या किमती कमी होऊन जनतेचा फायदा होऊ शकतो.- तुषार कोठारी, व्यापारी, बुलडाणा.