जळगाव जामोद, दि. २४- कला, क्रीडा आणि कार्यानुभव विषयाकरिता आरटीईच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या विविध शाळांवर नियुक्त करण्यात आलेले अतिथी निदेशक अद्यापही मानधनाविनाच काम करीत आहेत.मार्च २0१६ पासून त्यांना शाळावर नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र ठरवून दिलेले मानधन अद्यापही न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सन २0१२-१३ मध्ये अंशकालीन निदेशक म्हणून या लोकांची नियुक्ती शासनाने स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून केली होती. त्यावेळी निदेशकांना ७५ रुपये तासिकेप्रमाणे महिन्याच्या किमान ४८ तासिका गृहीत धरुन पाच हजार रुपये एवढे मानधन देण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षे निदेशकांची सेवा खंडि त करण्यात आली. ऑक्टोबर २0१५ च्या शासन परिपत्रकानुसार २0१६ अखेरीस १00 पटसंख्या इयत्ता ६ ते ८ पर्यंंंतच्या शाळांवर अंशकालीन निदेशकांना अतिथी निदेशकांचे संबोधन देऊन पुनर्नियुक्त्या देण्यात आल्या. इयत्ता ६ ते ८ वर्गापर्यंंंत १00 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या जवळपास १0५ शाळांवर कला, क्रीडा आणि कार्यानुभव अशा प्रकारे अंदाजे ३00 लोक काम करीत आहेत. दररोज शाळेवर जाऊन अध्यापनाचे कार्य हे अतिथी निदेशक प्रामाणिकपणे करत असताना गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्यांना मानधन नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. २0१२-१३ मध्ये पाच हजार रुपये मानधन देण्यात आले. मात्र नवीन शासन परिपत्रकानुसार अडीच हजार रुपये एवढेच मानधन करण्यात आले आहे आणि तेही अद्याप मिळाले नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार या पदांवर २0१२-१३ मध्ये काम केलेल्या निदेशकांना प्राधान्यक्रमाने नियुक्त्या दिल्या गेल्या. शासन आपणास सेवेत सामावून घेईल. अन्यथा माधनात वाढ करेल, या आशेने हे अतिथी निदेशक शाळांवर सेवा देत आहेत. तेव्हा या सर्व निदेशकांना दिवाळीपूर्वी मानधन देण्याची मागणी जिल्हा संघटनेचे जयदेव वानखडे यांनी केली आहे.
अतिथी निदेशक मानधनाच्या प्रतीक्षेत!
By admin | Published: October 24, 2016 2:44 AM