फवारणी करताना गळके फवारणी यंत्र वापरु नये, फवारणीच्या वेळी संरक्षक कपडे, हातमाेजे, मास्क यांचा वापर करावा. तणनाशक व कीटकनाशक फवारणीसाठी वेगवेगळ्या पंपाचा वापर करावा, कीटकनाशके ही लहान मुले, खाद्यपदार्थ तसेच गुरांपासून दूर ठेवावे, हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये, फवारणी करताना धुम्रपान वगैरे करु नये, फवारणीचे मिश्रण काठीच्या सहायाने ढवळावे, कीटकनाशकांच्या बाटल्या वापरानंतर जमिनीत गाडून नष्ट करावव्यात, फवारणी झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ करुन कपडे स्वच्छ धुवावेत आदी गोष्टींचे महत्त्व पटवून दिले. यावेळी अंकुश मेहेत्रे व इतर शेतकरी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे, रावे समन्वयक मोहजीतसिंग राजपूत, कीटकशास्र विभागाचे प्रमुख प्रा. विलास चव्हाण, प्रा. मंगेश धांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
औषध फवारणीच्या दक्षतेविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:37 AM