बुलडाणा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वातभारतीय जनता पार्टी चे राज्य सरकारला अडीच वर्ष पूर्ण झालीत. या अडीचवर्षाच्या कार्यकाळात भाजपा सरकारने अनेक शेतकरी हिताच्या योजनाराबविल्या. या योजनांची शेतकऱ्यांना माहिती व्हावी व त्यांनी या योजनांचाअधिकाधिक लाभ घ्यावा. तसेच बळीराजाची कर्जातून कायम मुक्ती व्हावी यासाठीह्यशाश्वत शेती समृद्ध शेतकरीह्ण हा नारा देऊन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकगावातील शिवारात शेतकरी बांधवासाठी शिवार संवाद सभांचे आयोजन करण्यात आलेआहे.बुलडाणा विधानसभा मतदार संघात भाजपा नेते योगेंद्र गोडे यांचे उत्कृष्ठनियोजनातून व प्रत्यक्ष उपस्थितीमधून २५ मे पासून या अभियानाला बुलडाणातालुक्यातील सव येथून सुरुवात झाली व ३० मे रोजी गुम्मी, जनुना, चौथा, मढया गावांमध्ये शिवार संवाद सभा यशस्वीरित्या पार पडल्या. या सभांना सदरगावांमधून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतानायोगेंद्र गोडे म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठीतीनशेहून अधिक उपयुक्त योजना आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांची माहिती घेवूनलाभ घ्यावा व आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनकेले.राज्यातील भाजपा सरकारला नुकतेच अडिच वर्ष पुर्ण झाले असून यादरम्यानकोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आज शासनाकडूनशेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. रासायनिक खते वबियाणे शासनाने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांना कृषीअवजारांवर सबसिडी असून सदर सबसिडी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमाहोत आहे. या शासनाने सर्व शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य पुरवठा सुरू केला आहे.शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंत बिनव्याज पिक कर्ज पुरवठा करण्यात येतो. याशासनाची जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक असून लोकप्रियठरली आहे. तसेच नुकतीच सुरू करण्यात आलेली ह्यगाळ मुक्त धरण व गाळ युक्तशेतीह्ण या योजनेमुळे शेतकरी समृद्ध होणार आहे. या सर्व कल्याणकारीयोजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी सदर शिवार संवादसभामध्ये शेतकऱ्यांना केले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या वत्यांना येणाऱ्या अडचणीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास योगेंद्रगोडे यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी बुलडाणा तालुका भाजपा अध्यक्ष अॅड.मोहन पवार यांनीही मार्गदर्शनकेले. या शिवार सभांना कुंदन गायकवाड, पंजाबराव सोर, फिरोज बेग, दीपकरुस्तके, पंजाबराव नरोटे, प्रभू जैस्वाल, रघुनाथ नरोटे, बापुराव नरोटे,अमोल बारवाल, पंजाबराव गायकवाड, गणपत जगताप, गजानन गायकवाड, हरिभाऊगायकवाड, गजानन पाटील, किसन पाटील, डॉ.संतोष कोंडे, संतोष गायकवाड, शोभागायकवाड, वंदना शेळके, यमुना गायकवाड, सुमन जगताप, अनिता दोड, प्रकाशपवार, रवी धनावत, अभिमन्यू जाधव, मंगल चांदा, शेरखान बागुल, वैजीनाथराजगुरे, विनोद पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शिवार संवादातून शेतकºयांना मार्गदर्शन
By admin | Published: June 01, 2017 2:39 PM