तसेच पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पेरू उत्पादक कंपनी तयार केल्यास पेरूवर प्रक्रिया करून विक्री केल्यास शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल, असे सुचविले. तसेच निबोंळी अर्क, वेळेवर छाटणी, खत नियोजन यांबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी पर्यवेक्षक दिनेश लंबे यांनी सद्य:स्थितीत पेरूवर फळमाशीचा जास्त प्रादुर्भाव होत आहे. त्याचे नियंत्रण ट्रॅप्स (सापळे) द्वारे कसे करायचे याचे प्रत्यक्ष शेतामध्ये प्रात्यक्षिक व सापळे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. जेणेकरून कमीत कमी खर्चात सापळे तयार करून पेरू उत्पादक शेतकरी आपला खर्च कमी करतील, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पेरू पिकावर येणाऱ्या सर्व रोग, किडी व्यवस्थापन नियोजन यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ही शेतीशाळा सवणा येथील प्रगतशील शेतकरी पुरुषोत्तम हाडे याच्या शेतात घेण्यात आली. यावेळी कृषी साहाय्यक अमोल बाहेकर, अतुल खारोळे, पेरू उत्पादक शेतकरी सत्यनारायण लढ्ढा, सुदर्शन भालेराव, विलास ठेंग, एकनाथ ठेंग, उद्धव भुतेकर, नारायण ठेंग, दीपक वाघ, अशोक चव्हाण, दत्तात्रय देशमुख, पुजाजी वाघ व गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
सवणा येथील शेतकऱ्यांना पेरू शेतीविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:36 AM