तालुक्यातील केळवद येथे प्रथमच सुमारे ४० शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.अनिल तारू यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, याच अभियानाअंतर्गत तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील शेतकरी सचिन देशमुख यांच्या शेतात पैनगंगा शेतकरी शेती उत्पादक कंपनीच्या माध्यमाने हळद लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कृषी आयुक्तालय पुणेचे महेश झेंडे, कृषी उपसंचालक विजय बेतीवार, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व शेतकरी उपस्थित होते. नाईक व झेंडे यांनी यंत्राद्वारे स्वत: हळद लागवड केली. यावेळी कृषी पर्यवेक्षक दिनेश लंबे, कृषी सहायक राहुल वानखेडे, अतुल खारोळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राम वाणी व शेतकरी उपस्थित होते.
केळवद येथे ‘विकेल ते पिकेल’बाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:23 AM