गतवर्षी शेतकऱ्यांना पेरणीकरिता बोगस बियाणे मिळाल्याने दुबार, तीबार पेरणी करावी लागली हाेती़ त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले व शेवटी उत्पन्न कमी झाले़; परंतु सोयाबीनला दर चांगला मिळाल्याने यावर्षी सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल राहणार आहे़ सोयाबीनची मोठी मागणी होणार असून चढ्या भावाने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ गतवर्षीसारखा कटू अनुभव येऊ नये म्हणून लोणार तालुका कृषी कार्यालयाकडून गावपातळीवर घरचे बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रियाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे़ दरम्यान, किनगाव जट्टू येथील भानुदास कायंदे, राजू सातपुते, काशीनाथ राऊत, विठ्ठल राठोड, गोविंद राठोड आदी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कृषी सहायक जी. एन. खंदारे, कृषिमित्र संदीप कायंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले़
बियाणे उगवण क्षमतेविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:36 AM