बुलडाणा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आध्यात्मिक, सामाजिक वराष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधनात्मक कार्याचा ठेवा श्रीगुरूदेव सेवा मंडळअखंडपणे जपत आहे. जिल्ह्यात गेल्या २२ वर्षापासून समाजप्रबोधनालादेशभक्तीची सांगड घालून खेड्यापाड्यापर्यंत तुकडोजी महाराजांचे विचारपोहचविण्याचे कार्य गुरूदेव सेवा मंडळांकडून सुरू आहे.‘ग्रामविकासात राष्ट्राचा विकास’ अशी विचारसरणी डोळ्यासमोर ठेवूनमहाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीआध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. जनसमुहालायोग्य रितीने कार्यप्रवृत्त करण्यासाठी सण १९३५ मध्ये अमरावतीजिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथे श्रीगुरूदेव धर्मसेवाश्रमाची वयुवकाकडून आष्टी येथे श्रीगुरूदेव आरती मंडळाची उभारणी करून शिस्तबद्धसंघटना सुरू केली. श्रीगुरूदेव आरती मंडळ शाखांचे श्रीगुरूदेव सेवामंडळनावाने पुनरूज्जीवन केले. बुलडाणा जिल्ह्यात श्रीगुरूदेव सेवा मंडळाचीशाखा २० नोव्हेंबर १९९५ पासून सुरू करण्यात आली. पण त्या अगोदर पासूनराष्ट्रसंताचे कार्य जिल्ह्यात सुरू होते. आचार्य हरीभाऊ वेरूळकर गुरूजीयांनी सर्वांगीण प्रशिक्षण वर्गाद्वारे जिल्ह्यातिलच नव्हेतर राज्यातीलबालक, तरूण आणि नागरिक सुसंस्कारित करण्याचे कार्य जवळपास १००पेक्षाजास्त वर्गाद्वारे सुरू आहे. श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या शाखेचेबुलडाणा जिल्हाध्यक्ष वाकोडे गुरूजी, सचिव प्रमोद दांडगे, प्रचारक दीपकमहाराज सावळे, प्रसिद्धी प्रमुख हरिदास खांडेभराड, गणेश राऊत, कृष्णकांतजोशी, गणेशराव डोईफोडे, रेखाताई खांडेभराड, वंदनाताई वाघ, रेखाताई खरातआदी कार्यकर्ते प्रबोधन, राष्ट्रसंत सहित्य प्रचार आणि प्रसाराचे अखंडकार्य करत आहेत. श्रीगुरूदेव सेवामंडळाकडून गावोगावी प्रबोधनात्मककार्यक्रम घेऊन तुकडोजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांच्या मनामनामध्येरूजविण्याचे कार्य सुरू आहेत.
नांदुरा जपतो महाराजांच्या आठवणीबुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा खु. येथे श्री गुरूदेव सेवाश्रमाची स्थापनाकरण्यासाठी तुकडोजी महाराज जिल्ह्यात आले होते. महाराजांच्या पदस्पर्शानेपावन झालेल्या नांदुरा खु. येथील श्री गुरूदेव सेवाश्रमातून आजतत्वज्ञानाची शिकवण देण्याचे मोलाचे कार्य होत असून बुलडाणा जिल्ह्यातीलनांदुरा आजही तुकडोजी महाराजांच्या आठवणी जपत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंतपोहचविण्यासाठी श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ म्हणजे त्यांच्या मनात घरकरून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप आहे. ग्रामगीतेतीलविचार आपला विकास साधण्यासाठी एक मोठी देणगी आहे.- भगवान राईतकर,ग्रामगीता अभ्यासक, बुलडाणा.