डाेणगाव परिसरातील गायरान जमिनीवर माेठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे, गुरांना चरण्यासाठी शेतीच शिल्लक राहिली नसल्याचे चित्र आहे. कऱ्हाडवाडी शिवारात ३६ एकर गायरान जमीन आहे. या जमिनीवरील अतिक्रमण काढून ठाेक्याने दिली आहे. यापुढे आता ही जमीन गुरांना चारण्यासाठी ठेवण्याची मागणी अमाेल धाेटे यांनी केली आहे.
डोणगाव येथे आरेगाव माळ, शेलगाव पार परिसरातील हिंदू स्मशानभूमीच्या बाजूला अंधारवाडी, कऱ्हाळवाडी, गणेश माळ, दगडखाणी व इतर काही ठिकाणी शेकडो शासकीय ई-क्लास जमीन आहे. यातील कित्येक जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यापैकी सद्य:स्थितीत कऱ्हाळवाडी शेतशिवारात असलेली ३६ एकर जमीन ही मागच्या वर्षी अतिक्रमणमुक्त करून ती जमीन ठोक्याने देण्यात आली होती. मात्र, ही जमीन जनावरांना चराई क्षेत्र म्हणून राखीव ठेवण्यात यावी, या मागणीचे निवेदन अमोल धोटे यांनी उपविभागीय महसूल अधिकारी मेहकर, तहसीलदार मेहकर व गटविकास अधिकारी मेहकर यांना देण्यात आले.
जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नासाठी आरेगाव माळावर असलेली ५० एकर शासकीय जमीन लवकरच अतिक्रमणमुक्त करून त्या ठिकाणी जनावरांचे चराई क्षेत्र करू.
- ज्ञानेश्वर चनखोरे ग्रामविकास अधिकारी डोणगाव