मार्च ते ऑगस्ट हा या स्वर्गीय नर्तक पक्ष्याचा विणीचा हंगाम असतो, आकर्षक असा स्वर व घरटे बांधण्याच्या पद्धतीमुळे तो परिचित आहे. मध्यम आकाराच्या बुलबुलसारखा हा आकर्षक पक्षी असून, त्याचे सौंदर्य खुलून दिसते. विशेष म्हणजे, घिरट्या घालून तो हवेतील कीटक, भिंगोटे यांना खातो. लोणार सरोवरासोबतच आता त्यामुळे मढीच्या जंगलाचेही संवर्धन होण्याची गरज आहे. दरम्यान, अनेक राज्यांचा व काही देशांचा हा राष्ट्रीय पक्षी असून, त्याच्यावर काही देशांनी टपाल तिकीटही काढलेले आहे. लोणारकर टीमेही या जंगलाचे संवर्धन होण्याची गरज व्यक्त केली आहे.
--१,२८८ हेक्टर क्षेत्रावर आहे जंगल--
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर मढीचे हे जंगल १,२८८ हेक्टरवर पसरलेले आहे. त्यामध्ये सावरगाव मुंढे आणि गंधारी या भागातील जंगलाचाही समावेश आहे. त्यामुळे या जंगलाचे संवर्धन होणे गरजेचे झाले आहे. त्या दृष्टीने आपण वनविभागाला एक पत्र देणार असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.