- नीलेश जोशीबुलडाणा: लोणार सरोवरातील सुमारे ६० हेक्टरवर पसरलेली वेडी बाभूळ काढण्यासाठी वन्यजीव विभागाने हॅन्डपिकींग मशिनला प्राधान्य देण्यासोबतच हटविण्यात आलेल्या वेड्या बाभळीच्या जागी स्थानिक वृक्ष लावण्यास प्राधान्य द्यावे यासंदर्भात नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती द्वय एस. के. सुक्रे आणि माधव जमादार लोणार येथे पाहणी केल्यानंतर अधिकाºयांच्या घेतलेल्या बैठकीत चर्चा केली. दरम्यान, सरोवराच्या पाण्याचा पीएच तपासण्यासोबतच या पाण्यातील सुक्ष्म घटकांचीही तपासणी व्हावी, या मुद्द्यावरही अनुषंगीक बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.लोणार सरोवर क्षती प्रतिबंध आणि संवर्धनाच्या दृष्टीने नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या संदर्भाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी जमिनस्तरावर कितपत झाली आहे, याची पडताळणी करण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी ते आले होते. यावेळी तहसलि कार्यालयात झालेल्या बैठकीत उपरोक्त विषयासंदर्भात ही प्रशासकीय अधिकाºयांना प्रश्न विचारून त्यांनी माहिती घेतली.दरम्यान, लोणार सरोवरात पसरलेल्या वेड्या बाभळीच्या निर्मुलनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून आतापर्यंत ६.६८ हेक्टरवरील वेडी बाभूळ काढण्यात आली आहे. या वेड्या बाभळीचे निर्मून करताना हॅन्डपिकींग मशीनचा वापर करण्याबाबत प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. सोबतच वेडी बाभूळ काढण्यात येत असल्याने त्याठिकाणी निर्माण होणाºया जागेत स्थानिक वृक्षांची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे त्यास पाणी दिले जावे या मुद्द्यावरही न्यायमुर्तींनी जाणून घेतले असल्याची माहिती आहे. स्थानिक वृक्ष तथा फळझाडे लावल्याने वन्यजिवांना त्याचा लाभ होईल, असा अंदाज आहे.
पाण्यातील सुक्ष्म द्रव्यांचीही तपासणीसरोवरातील पाण्यात असलेल्या ब्लु ग्रिनरी, पाण्याचा पीएच आणि सुक्ष्म द्रव्य तपासणीसंदर्भातही न्यायमुर्तींनी बैठकीत माहिती जाणून घेतली. दरम्यान, यापूर्वी खंडपीठाच्या निर्देशानुसार भुजल सर्व्हेक्षण विभागाने लोणार सरोवर परिसरातील साडेसहा किलोमीटर परिघातील विहीरी, बोअरवेलच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याचा अभ्यास करत रासायनिक तपासण्या करण्यात आल्या होत्या. २३ आॅगस्टला त्याचा अहवाल खंडपीठास सादर करण्यात आला होता. अनुषंगीक विषयान्वये सरोवरातील मध्यभागातील पाण्याचीही तपासण्यासंदर्भात खंडपीठात याचिका दाखल करणाºयांपैकी एकाने चर्चेदरम्यान मुद्दा उपस्थित केला आहे. आता न्यायमुर्तींनी पाहणी केल्यानंतर काय आदेश देतात याकडे लक्ष लागून राहले आहे. यापूर्वी सरोवरातील पाण्याची रासायनिक गुणवत्ता अभ्यासासोबतच जुनी गुणवत्ता व आताची गुणवत्ता नेमकी कशी आहे किंवा होती याचा अभ्यास करण्याबाबतही यापूर्वीच नागपूर खंडपीठाने सुचीत केलेले आहे.