बुलडाणा : घरासमोरील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास विरोध केल्याने पत्नीचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी पती व सासुविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महिलेने शहर पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मुद्रांक जादा दराने विकू नये
बुलडाणा : शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्याकरीता लागणारे स्टँप पेपर आणि पेरणीकरीता लागणारे बि-बियाणे व खताचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांचे परवाने रद्द केल्या जातील, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला. पेरणीच्या तोंडावर असे प्रकार सातत्याने घडत असतात.
नियम पाळून सण साजरे करा
बुलडाणा : शहर पोलीस ठाण्यात १० एप्रिल रोजी सकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात महापुरुषांची जयंती, सण, उत्सव साजरे करताना शासनाने ठरवून दिलेले कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनाचा जीवनदायी योजनेत समावेश करा
बुलडाणा : कोरोना या आजाराचा जीवनदायी योजनेत समावेश करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानीचे राणा चंदन यांनी केली आहे. कोरोना व लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. शासकीय कोविड सेंटर फुल झाले आहेत.
लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध
बुलडाणा : कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे राज्या शासनाने कडक लॉकडाऊन लागू केले आहे. याला व्यापारी वर्गाचा विरोध आहे. मागील लॉकडाऊनमध्ये झालेले नुकसान आतपर्यंत भरून निघले नाही. अशातच आता पुन्हा लावलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.
विकेंड लॉकडाऊनमुळे बसफेऱ्या रद्द
बुलडाणा : कोरोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी शासनाने शनिवार व रविवार विकेंड लॉडाऊन लागू केला आहे. यामुळे शनिवारी व रविवारी अनेक बसफेऱ्या रद्द झाल्या. परिणामी प्रवाशांना नियोजित ठिकाणी जाण्यासाठी बस न मिळाल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती
बुलडाणा : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस पडल्यास कांदा पिकाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतात काढून ठेवलेल्या हरभरा पिकालादेखील झळ पोहचू शकते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली आहे.
बुलडाणा, खामगाव कोरोनाचे हॉटस्पॉट
बुलडाणा : बुलडाणा व खामगाव शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येथे बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्व अंमलबजावणी करत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात नियमांचे उल्लंघन
बुलडाणा : कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. मात्र याकडे ग्रामीण भागातील नागरिकांकडून दुर्लक्ष होत असून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनावर उपचार म्हणून वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनसाठी नातेवाइकांची धावपळ होत आहे. मात्र हे इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाइकांसह रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत.
शासनाने महावितरणचा भरणा करावा
बुलडाणा : १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीचे थकीत विजबील भरण्याचे आदेश उंद्री ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींसाठी देण्याची मागणी भाई प्रदीप अंभोरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
महात्मा फुले जयंती उत्साहात
बुलडाणा : शहरात महात्मा फुले जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने कोरोनाविषयक नियमांचे पालन करत अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोरोनाविषयक नियम पाळून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
विवाहितेचा विनयभंग, गुन्हा दाखल
बुलडाणा : एका २१ वर्षीय विवाहितेचा एका युवकाने विनयभंग केल्याची घटना स्थानिक जोहर नगर भागात शुक्रवारी घडली. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरून युवकाविरूद्ध बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.