बुलडाणा : सध्याच्या आधुनिक युगात माेबाईलचा वापर माेठ्या प्रमाणात वाढला आहे़ अनेकांना फेसबुक आणि व्हाॅटसॲपचे वेडच लागल्याचे चित्र आहे़ यामध्ये महिलांचाही समावेश आहे़ काही विकृत मानसिकतेचे लाेक साेशल मीडियावरही महिलांचा छळ करीत असल्याचे चित्र आहे़ अनेक महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही़ सन २०१८ ते २०२१च्या जुलैपर्यंत ३२ महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत़
अनेक मुलींचे फेसबुक, व्हाॅटसॲप, इन्स्टाग्राम, टि्वटर आदींवर अकाऊंट आहे़ बहुतांश मुली आपले फाेटाे समाज माध्यमावर टाकत असतात़ त्याचा दुरुपयाेग करून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लाेक मुली आणि महिलांना ब्लॅकमेल करतात़ काही मुले मुलींना वारंवार फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, अश्लील मॅसेज पाठवणे, व्हाॅटसॲपवर अश्लील चित्रफित टाकणे आदी प्रकार करून मुलींचा छळ करीत असल्याचे चित्र आहे़ अनेक मुली बदनामीच्या भीतीने पाेलिसात तक्रार करीत नसल्याने अशा गुन्हेगारांवर वचक बसत नाही़ त्यामुळे, असा प्रकार घडल्यास महिलांनी तक्रार करण्याची गरज आहे.
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
गत काही वर्षांत हे प्रकार माेठ्या प्रमाणात वाढले आहेत़ अनेक मुली बदनामीच्या भीतीने तक्रारच करीत नाहीत़ अनेकदा युवती, महिलांना अश्लील मॅसेज येतात. अश्लील व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात येतात. यात नातेवाईक, जवळच्या महिला, शोषण करून अश्लील व्हिडिओ तयार करतात. हे व्हिडिओ दाखवून त्यांचे वारंवार शोषण करतात. परंतु बदनामीच्या भीतीने अनेक युवती, महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अशा महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्याची गरज आहे़
महिलांनी तक्रार करावी
अनेक महिलांचा फेसबुक, व्हाॅटसॲप, इन्स्टाग्रामवर छळ केला जाताे़ बदनामीच्या भीतीने अनेक महिला व मुली तक्रार करीत नसल्याचे चित्र आहे़ असा प्रकार घडलेल्या युवती व महिलांनी समाेर येऊन तक्रार करावी़ महिला आणि युवतींचे नाव गुप्त ठेवले जाते़ त्यामुळे, बदनामीची भीती न बाळगता तक्रार करावी़ तक्रार आल्यास महिलांचा छळ करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येईल़
प्रदीप ठाकूर, पाेलीस निरीक्षक,सायबर सेल
अशी घ्यावी काळजी
फेसबुक, व्हाॅटसॲपचा वापर करताना महिला आणि मुलींनी स्वत:चा फाेटाे डीपी म्हणून ठेवू नये़ तसेच फेसबुकवर खासगी फाेटाे शेअर करू नये़ फेसबुकची आपली प्राेफाईल लाॅक करून ठेवावी़ ती केवळ आपल्या मित्रांनाच पाहता येईल,असे सेटिंग करून ठेवावे, व्हाॅटसॲपचे तसेच सेटिंग करावे. अनाेळखी इसमाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये़ अनाेळखी लाेकांबराेबर चॅटिंग करू नये़ मुली व महिलांनी साेशल मीडियाचा वापर करताना काळजी घेण्याची गरज आहे़
येथे करा तक्रार
साेशल मीडियाच्या माध्यमातून कुणी छळ करीत असल्यास त्याची तातडीने जवळच्या पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी़ ही तक्रार सायबर सेलकडे संबंधित पाेलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येते़