शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

बुलडाणा जिल्ह्यात आठ मंडळामध्ये अतिवृष्टी; शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 2:14 PM

बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पहिल्यांदाच सार्वत्रिक स्वरुपाचा झालेला पाऊस खरीप हंगामाच्या दृष्टीने पोषक ठरणारा आहे. दरम्यान, जिल्ह्यात ९० मंडळांपैकी आठ मंडळ आणि खामगाव शहरात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.बुधवारी रात्री जिल्ह्यात या सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची संततधार सुरू होती. गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा बुलडाणा तालुक्यात ६१ मिमी तर शेगाव तालुक्यात ५२.२ मिमी पडला. , म्हसला बुद्रूक, धाड, देऊळघाट, साखळी बुद्रूक, डोणगाव, अमडापूर, धोडप, टिटवी या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. यंदाच्या पडलेल्या पावसाची त्याच्याशी तुलना करता वार्षिक सरासरीच्या ११.५१ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या सरासरीशी तुलना करता ती ५४.३१ टक्के आहे. दरम्यान पडलेल्या या सार्वत्रिक स्वरुपाच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यात सर्वत्र पेरण्यांनी वेग घेतला आहे. जवळपास २० दिवस उशिराने का होईना हा पाऊस आला असून एक प्रकारे खरीप हंगामातील पेरणीमध्ये या पावसाने जान आणली आहे. परिणामी कृषी विभागास किमान पक्षी आता आपतकालीन नियोजन करण्याची तुर्तास तरी गरज भासणार नसल्याचे चित्र या पावसामुळे निर्माण झाले आहे. दरम्यान असे असले तरी देऊळगाव राजा तालुक्यात अद्याप अपेक्षीत असा पाऊस पडलेला नाही. या तालुक्यात जून महिन्याच्या सरासरीचा विचार करता अवघा १८.७९ टक्केच पाऊस पडला आहे.अतिवृष्टीमुळे तांदुळवाडी, कोलवडमध्ये नुकसानदेऊळघाट सर्कलमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेत जमीन खरडून गेली आहे. सोबतच गावा लगतच्या ६० ते ७० घरामध्ये पुराचे पाणी घुसून ग्रामस्थांचे गृहोपयोगी साहित्य पुरात वाहून गेले. त्यामुळे गावातील जवळपास २५ कुटुंबांच्या घरात गुरूवारी चुल पेटू शकली नाही. पुरामुळे प्रकाश रिंढे व अन्य एका व्यक्तीचे सुमारे साडेतीनशे पक्षी मृत पावले असून चार बकºयाही दगावल्या आहेत. या व्यतिरिक्त शेतीचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठच्या शेतात दगडांचा खच निर्माण झाला आहे. तांदुळवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या जवळपास २६ ते २७ विहीरी खचल्या असून शेतकºयांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. अशीच काहीशी परिस्थिती ही कोलवड परिसरातही झाली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या प्रकरणी तहसिलदारांनी नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांना दिले आहे.टिटवी मंडळात सर्वाधिक पाऊस४जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून यामध्ये लोणार तालुक्यातील टिटवी मंडळात तब्बल १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अमडापूर मंडळात १०० मिमी, साखळी बुद्रूक मध्ये ८६, धाड मंडळात ८१ मिमी, डोणगावमध्ये ७८, म्हसला बुद्रूकमध्ये ७१, देऊळघाटमध्ये ७३, धोडपमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ््यातील ही पहिलीच अतिवृष्टी आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.दोन जण वाहून गेल्याची अफवा पैनगंगा नदीला बुधवारी मध्यरात्री आलेल्या पुरात दोन जण वाहून गेल्याची अफवा दिवसभर होती. मात्र तथ्य तपासले असता ती अफवाच असलेल्या बुलडाणा तहसिलमधील आपत्ती विभागाशी सबंधित लिपीकाने स्पष्ट केले. मात्र पुराच्या पाण्यात एक चार चाकी वाहन वाहून जाता जाता बचावले. या वाहनातील नागरिक सुरक्षीतपणे बाहेर पडले होते. मात्र ते कोण होते याची माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस