संख्येने बाहेर पडताना दिसले. तपासणीदरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून ई-पासची सुविधा लागू करण्यात आली होती. मात्र, त्याचाही नागरिक गैरफायदा घेऊ लागल्यामुळे पोलिसांवर ताण वाढला. यामध्ये अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अन्य प्रकारच्या टाळता न येण्यासारखी कारणे देण्यात आली आहेत.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अनेक जण वैद्यकीय, तसेच नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासारखी विविध कारणे देताना दिसले. यात मे महिना असल्याने लग्न समारंभाची सर्वाधिक कारणे समोर आली. लग्नाला जायचे म्हणून ई-पास नाकारल्यानंतर लगेचच त्याच व्यक्तींकडून ई-पाससाठी वैद्यकीय किंवा अंत्यसंस्काराची कारणे देण्यात येत असल्याचे दिसून आले. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही कारण दाखवू; परंतु ई-पास मिळवूच, अशीच भूमिका काहींनी ठेवलेली होती.
सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?
ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्या बहुतांश जणांचे कारण हे मेडिकल इमर्जन्सीच दाखविण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ई-पाससाठी अर्ज -३५७२५
मंजूर अर्ज -८५००
नामंजूर अर्ज - २७२२५