वृक्षलागवडीने नटली वनराई
साखरखेर्डा : रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभागाने साखरखेर्डा ते शेंदुर्जन, तांदूळवाडी फाटा ते गोरेगाव यासह परिसरात हजारो वृक्ष लागवड करून ते जगविले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वनराई नटली आहे. गत अनेक वर्षांपासून सार्वजनिक वनीकरण विभागात वन कामगार म्हणून मधुकर खंडारे काम करीत आहेत. साखरखेर्डा ते शेंदुर्जन रोडलगत वृक्षलागवड करून शासनाने दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता त्यांनी केली. त्यामुळे नऊ किलोमीटर अंतरावर शेकडो वृक्ष डोलत आहेत.
जांभरून रोडवर पार्किंगची समस्या
बुलडाणा: शहरातील बसस्थानकाच्या मागील बाजूने गेलेल्या जांभरून रोडवर पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. या रोडवर सर्च दवाखाने असून, या दवाखान्यात येणाऱ्यांना वाहने उभी करण्यासाठी व्यवस्थाच नसल्याचे चित्र आहे. आठवडी बाजारात दुकानांसमाेरच वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेताे. आठवडी बाजाराच्या दिवशी ऑटाेचालक रस्त्याच्या मध्येच वाहने उभी करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागताे.