शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

गणवेश न देणा-या शाळांचा अहवाल मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 12:18 AM

लोकमत वृत्ताची दखल; शिक्षण विभागाने तात्काळ मागविला अहवाल.

बुलडाणा : शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांना गणवेश देण्याचा नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश न देणार्‍या शाळांचा अहवाल शिक्षण विभागाने मंगळवारी तत्काळ मागविला आहे. शाळा सुरू होण्याच्या आधीच्या दिवशीच विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा गणवेश पोहोचायला हवा, असे स्पष्ट निर्देश शासनाने शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिले आहेत; मात्र त्यानंतरही या नियमांची पायमल्ली होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर मंगळवारी शिक्षण विभागाने पहिल्या दिवशी शाळांना गणवेश न देणार्‍या शाळांचा अहवाल उपशिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी मागविला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने अहवाल दिल्यानंतर गणवेश विद्यार्थ्यांना का मिळाला नाही? याची चौकशीही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश देणे आवश्यक असतानाही गणवेश मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अलका चित्रांगण खंडारे यांनी मंगळवारी दुपारी उपशिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांना जाब विचारला. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही, त्याकरिता जबाबदार कोण, याचा अहवाल मागवून संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचनाही केल्या.