शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

मुख्याध्यापकावर गोळी झाडली!

By admin | Published: June 30, 2017 12:44 AM

मलकापूर येथील घटना : गोळीबार करणारे पसार

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : स्वत:च्या घरासमोर मोबाइलवर बोलत असताना मुख्याध्यापकावर अज्ञात इसमांनी गोळी झाडल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील घिर्णी रस्त्यावरील महाराणा प्रतापनगरात २८ जूनच्या रात्री १०.४० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जखमीस गंभीर अवस्थेत कोलते हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गोळी बाहेर काढण्यात आली असून, रुग्णाची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आरोपी फरार झाले असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.मोताळा तालुक्यातील निपाणा येथील भिकमसिंह पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक रवींद्रसिंह गुलाबसिंह राजपूत (वय ४६) हे घिर्णी रस्त्यावरील महाराणा प्रतापनगरातल्या त्यांच्या राहत्या घरासमोर रात्री १०.४० वाजता मोबाइलवर बोलत होते. अचानक मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी एकाने पाठीमागून त्यांच्यावर गोळी झाडली. पाठीमागून उजव्या बाजूने झाडलेली गोळी पोटाच्या डाव्या बाजूने आतड्यात फसली. दरम्यान, रक्तस्राव झाल्याने रवींद्रसिंह राजपूत खाली कोसळले. गंभीररीत्या जखमी झाल्यावरही त्यांनी रक्ताच्या थारोळ्यातील अवस्थेत शेजारी राहणारा मित्र छोटू व संदेश चोरडिया यांना फोन लावला व त्यांच्या मदतीने रात्री ११ वाजेच्या सुमारास कोलते हॉस्पिटल गाठले.शल्यचिकित्सक डॉ.अरविंद कोलते व डॉ.गौरव कोलते यांनी तत्काळ रुग्णास आॅपरेशन थिएटरमध्ये दाखल केले व उपचार सुरू केले. तब्बल अडीच तासंच्या शस्त्रक्रियेनंतर रवींद्रसिंह राजपूत यांच्या पोटातील गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. सद्यस्थितीत रुग्णास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, प्रकृती स्थिर पण नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेत अज्ञात इसम कोण असावेत व त्यांनी कोणत्या कारणावरून गोळी झाडली, यासंदर्भात अद्याप उलगडा झाला नाही. शहर पोलिसांनी जखमीची पत्नी सपना रवींद्रसिंह राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३४ भादंवि आर्मअ‍ॅक्ट ३, २५ नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे महाराणा प्रताप नगरात एकच खळबळ उडाली आहे. ‘त्या’ घटनेची आठवणया आधी सन २०१२ साली देखील अज्ञात दरोडेखोरांनी मुख्याध्यापक रवींद्रसिंह राजपूत यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता. त्यात चार जणांना रवींद्रसिंह यांनी एकट्याने रोखले असता त्यातील एकाने धारदार शस्त्राचा वार करून त्यांना गंभीररीत्या जखमी केले होते. त्या घटनेस यानिमित्ताने उजाळा मिळाला.