लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती व रुग्ण दुपटीचा वाढता वेग पाहता राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची अर्थात २७ लाख नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ताप, दुर्धर आजार व शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी असणे या पैकी कोणतीही दोन लक्षणे आढळल्यास थेट संबंधित व्यक्तींना फिव्हर क्लिनीक किंवा कोवीड सुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.येत्या १५ सप्टेंबरपासून ही दोन टप्प्यातील जम्बो मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १५ दिवस व दुसऱ्या टप्प्यात दहा दिवस या प्रमाणे २५ आॅक्टोबर पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ६०० पथके स्थापन करण्यात येणार असून या पथकांमध्ये प्रत्येकी एक डॉक्टर राहणार असून घरपरत्वे वैयक्तिकस्तरावर ताप, खोकला, दम लागणे, शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण आणि दुर्धर आजारांची माहिती घेवून लक्षणे आढळलेल्यांना त्वरित नजीकच्या फिव्हर क्लिनीकमध्ये दाखल केले जाईल. त्यानुषंगाने प्रत्येक पथकातील सदस्याकडे इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स आॅक्सीमीटर, सॅनिटायझरराहणार आहे.दुर्धर आजार असणारे व्यक्ती नियमित उपचार घेत आहे का? याची खात्री करण्यात येवून आवश्यक तेथे त्वरित तपासणी करण्यात येणार आहे. नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात हे सर्वेक्षण होणार असून १३ सप्टेंबर रोजी या जम्बो मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन बैठक घेत आहे.कोरोनाचे जिल्ह्यात वाढते संक्रमण रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात येणार असून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये हे फिव्हर क्लिनिक म्हणून काम पाहणार आहेत. पहिल्या टप्प्यात तपासणी केलेल्या प्रत्येक घरावर एक स्टीकर लावण्यात येणार आहे. १५ दिवसात २७ लाख नागरिकांची जिल्ह्यात तपासणी करण्यात येवून यासाठीच्या अॅपमध्ये माहिती भरण्यात येणार आहे.असा राहील मोहिमेचा कालावधी‘माझे कुटुंब माजी जबाबदारी’ या शिर्षकाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते दहा आॅक्टोबर व दुसºया टप्प्यात १४ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार असून गृहभेटी दरम्यान, प्रत्येक घरावर एक स्टीकर लावण्यात येणार आहे. या स्टीकरवर अॅपमध्ये भरलेली माहिती राहील.
बुलडाणा जिल्ह्यातील २७ लाख नागरिकांचे होणार आरोग्य सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:45 AM