- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : इंग्रजी संस्कृतीचे लोण खेडोपाडी पोहचले आहे. परंतू या शाळेचे शिक्षण महागडे राहते. त्यामुळे कष्टकरी पालकांच्या मुलांनाही गुणवत्तापूर्ण व बहू कौशल्य असे शिक्षण मोफत मिळावे, यासाठी धाड येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाने शाळेतच ‘मल्टी स्कील व हेल्थ केअर’चे धडे देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे. जिल्हा परिषदसारख्या शाळेतही मुलांना असे व्यावसायीकदृष्ट्या महत्त्वाचे शिक्षण दिले जात असल्याने नदी आडवी असतानाही विद्यार्थी याच शाळेत येतात.‘माझी शाळा, माझे उज्वल भविष्य’ हे ब्रीद शाळेत प्रवेश करताच मुख्य प्रवेशद्वारावर नजरेस पडते. या ब्रीद वाक्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उज्वल भविष्याचे स्वप्न शाळेच्या उंबरठ्यावर निर्माण होते. बुलडाणा तालुक्यातील धाड येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाचे हे एकच वेगळेपण नाही, तर शाळेत प्रवेश केल्यानंतर विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे दर्शन येथे घडते. पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत नववी व दहावीसाठी मल्टी स्कील व हेल्थ केअर हे विषयांच्या तासिका घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायीक शिक्षणाचे परिपूर्ण ज्ञान आतापासूनच याठिकाणी मिळत आहे. यासोबतच आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती या विद्यार्थ्यांना दिली जात आहे. त्यासाठी विशेष लॅबही येथे उपलब्ध आहे. सुसज्ज प्रयोगशाळा येथे आहे.वृक्षलागवड शतकापारया शाळेत दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. वृक्षारोपणानंतर त्याचे संगोपणही चांगल्या प्रकारे केले जाते. त्यासाठी सर्व शिक्षकांसोबत विद्यार्थी झटतात. विद्यार्थी व शिक्षकांच्या परिश्रमाने शाळा परिसरातील वृक्षलागवड आज शतकापार गेली आहे. वेगवेगळ्या वृक्षांमुळे शाळेचा परिससर नजरेत भरण्यासारखा आहे. याठिकाणी सध्या धाडसह कुंबेफळ, टाकळी, बोरखेड, धामणगाव, सावळी, ढालसावंगी अशी दूरवरुन मुले शिक्षणासाठी येतात.
येथे घडले कृषी व जलसंधारणचे सचिव
माळवंडी सारख्या खेड्यातून दूरपर्यंत पायी व तेथून बसने धाड जि.प. हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येणारे एकनाथ डवले आज महाराष्ट्राचे कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव येथे घडले आहेत.
परिसरातील अनेक गावांमधून मुले येथे शिक्षणासाठी येतात. त्यांना नावीण्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो. शाळेसाठी लोकसहभागी चांगला मिळतो.-सतीष तायडे, मुख्याध्यापक
जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उपक्रमांवरही भर दिल्या जात आहे. या आदर्श शाळेत आदर्श विद्यार्थी घडत आहेत.-चंद्रकलाबाई सुरेश आघाव, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती.