खरीप हंगामातील कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना पुन्हा रब्बीत निसर्ग कोपला आहे. 26 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेदरम्यान विजेच्या कडकडासह वादळी वारा आणि त्यासोबत मुसळधार पाऊस बरसला. यावेळी सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार तालुक्यात पळसखेड चक्का गोळेगाव तुळजापूर, सोनोशी, किनगाव राजा मंडळात लिंबू आणि बोराच्या आकाराएवढ्या गारांचा पाऊस बरसला. त्यामुळे उभे पीक आडवे झाले.
भाजीपाला, तूर, कपाशी, कांदा, ज्वारी, हरभरा, मका, गहू, पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नेटशेड गाराच्या ओझ्याने फाटले. यामध्ये असलेले मिरची, टोमॅटो पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरात जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. किमान उत्पादनापासून जवळपास 15 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असते. कंपनीने थेट मदत करावी आणि शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.