शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
2
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
3
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
4
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटख्या जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
5
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
6
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
7
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
8
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
9
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
10
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
11
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
12
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
13
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
14
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
15
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
16
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
17
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट
18
निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?
19
“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली
20
"आम्ही कधीही लग्न करणार नाही’’, १२ तरुणींनी घेतला अजब निर्णय, कारण काय? 

जिल्ह्यात जोरदार पावसाने उडविली दाणादाण; हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By विवेक चांदुरकर | Published: September 12, 2022 4:10 PM

रविवारी सायंकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

खामगाव: जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह रविवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच दाणादाण उडविली. या पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रविवारी सायंकाळी ७ वाजेपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात ६० मिमी पाऊस झाला. या पावसामुळे काही भागात झाडे पडली असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. तसेच खामगाव शहरात टाॅवरवर वीज पडून नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. यावर्षी शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये पाऊस न झाल्याने पेरणी केली नाही. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कपाशीची पेरणी केली. मात्र, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी उलटली. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली.

परिणामी उत्पादन खर्च वाढला. सोयाबीन व कपाशीचे पीक उत्तम स्थितीत असताना गत दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक एक महिन्यानंतर काढणीला येणार होते. मात्र शुक्रवारी व शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. खामगाव तालुक्यातील बोरी, अडगाव, बोथाकाजी, पळशी बू या परिसरात शेतात पाणी साचले असल्यानेही पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खामगावातील विद्युत पुरवठा बंद

शनिवारी सायंकाळी शहरातील बहुतांश भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागले. वाडी गावातील विद्युत पुरवठा सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान खंडित झाला होता. रात्री १२ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ग्रामीण भागातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.आगामी दोन दिवस सार्वत्रिक पावसाची शक्यता

जिल्ह्यात शनिवार व रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. तसेच आगामी दोन दिवस १३ व १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर १६ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसbuldhanaबुलडाणा