शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

जळगावात जोरदार पाऊस; तालुका मात्र कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2017 1:04 AM

जळगाव जामोद : जळगाव शहरात गुरुवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला; परंतु हा पाऊस फक्त शहरात व शहराच्या आजूबाजूच्या परिसरातच बरसला.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : जळगाव शहरात गुरुवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह अर्धा तास जोरदार पाऊस झाला; परंतु हा पाऊस फक्त शहरात व शहराच्या आजूबाजूच्या परिसरातच बरसला. तालुक्यात मात्र पाऊस झाला नाही. गत दहा वर्षांमध्ये प्रथमच १ जून रोजी पावसाची नोंद झाली. जळगाव शहरासोबतच अल्प पाऊस वडशिंगी परिसरातसुद्धा झाला. या पावसाने शेतकरी वर्ग शेतीच्या मशागतीसाठी आणखी जोमाने लागला आहे.जळगाव तालुक्यात जळगाव, जामोद, वडशिंगी, आसलगाव व पिंपळगाव काळे अशा पाच ठिकाणी महसूल विभागाच्यावतीने जलमापन यंत्र बसविण्यात आले आहे. गुरुवारी जळगावात ३९ मि.मी. पावसाची नोंद झाली तर जामोद, आसलगाव व पिंपळगाव काळे येथे पाऊसच झाला नाही. वडशिंगी येथे अल्प पाऊस झाला येथे ७ मि.मी. पावसाची नोंद झाली. एक जून रोजी पावसाने हजेरी लावण्याची ही दहा वर्षांतील पहिलीच वेळ आहे.

नाल्याची भिंत कोसळलीपोटचिरीच्या नाल्यावर नव्यानेच उभारण्यात आलेल्या भिंतीची एक कडा विद्या नगर परिसराजवळ पाण्याच्या दाबाने कोसळली. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने विद्या नगर परिसरातील पाणी या भिंतीला थडकले आणि भिंत कोसळली. या नाल्यात येणाऱ्या कॉलनीतील पाण्यासाठी वाट ठेवावयास पाहिजे होती; परंतु तसे डिझाइन नसल्याने नवीनच उभारलेली भिंत नाल्यात कोसळली. नगर परिषदेचे काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप, नगरसेवक नितीन ढगे, श्रीकृष्ण केदार यांनी हा विषय बोगस कामांचा नमुना असल्याचे म्हटले. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके, अभियंता म्हस्के यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.खामगाव परिसरात रिमझिमखामगाव शहर व परिसरात शुक्रवारी सकाळी रिमझिम पाऊस झाल्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. दरवर्षी तालुक्यालगत असलेल्या भागात पाऊस होत असताना खामगाव परिसरात मात्र पाऊस हुलकावणी देत असल्याचा अनुभव आहे. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाचीसुद्धा परिसरात हुलकावणी देत असल्याने आतापासूनच चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असून, पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. सर्वच वाणांचे बाजारभाव कमी होत असल्याने कोणते पीक घ्यावे, या गर्तेत शेतकरी सापडला आहे.