शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

साखरखेर्डा मंडळात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:24 AM

साखरखेर्डा मंडळामध्ये बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७४ मिमी पावसाची नोंद झाली. अवघ्या १ मिमी पावसामुळे तांत्रिकदृष्ट्या या मंडळामध्ये अतिवृष्टीची ...

साखरखेर्डा मंडळामध्ये बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७४ मिमी पावसाची नोंद झाली. अवघ्या १ मिमी पावसामुळे तांत्रिकदृष्ट्या या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद होऊ शकली नाही. मात्र, या मंडळात पावसामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या पावसामुळे सवडद येथील कोराडी नदीला पूर आल्यामुळे सवडद ते गजरखेड रस्त्यावरील पूल हा वाहून गेला आहे. या पुलाची उंची कमी असून २००१ तो उभारण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून पुराच्या पाण्याचे धक्के बसलेल्याने या पुलाला आधीच तडे गेले होते. त्याच्या दुरुस्तीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. सरपंच शिवाजी लहाने यांनी मेहकर व देऊळगाव राजा विभागाशी त्यासंदर्भात पत्रव्यवहारही केला होता. मात्र, दोन्ही विभागांनी हा पूल आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगत ग्रामपंचायतीकडे लक्ष वेधले होते. मात्र, आता पूलच मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्याचा एकमेव मार्गच बंद झाला आहे. पंचायत समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनीही या पुलासाठी उपोषण केेले होते. आता पहिल्याच पावसाच हा पूल वाहून गेल्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. --उमनगावचाही संपर्क तुटला--

उमनगावचाही यामुळे संपर्क तुटला आहे. गोरेगाव ते उमनगाव रस्त्यावरील पूल पावसाने क्षतिग्रस्त होऊन त्याचा काही भाग वाहून गेला आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे या नाल्यावरील पूल वाहून गेला होता. गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुरूम टाकून कसाबसा तो वापरण्याजोगा केला होता. १५ दिवसांपूर्वी सरपंच प्रकाश भगत, माजी सरपंच मोहन गायकी, शांताराम गवई, पंजाबराव मोरेंसह ग्रामस्थांनी पुलाचे काम करण्याची मागणी जि. प. बांधकाम विभागाकडे केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. आता उमनगावमध्ये कोणतेच वाहन जाऊ शकत नसल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे.

-मेरा रस्त्याची दुरावस्था--

साखरखेर्डा ते मेरा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. १८ कि.मी.चा हा रस्ता असून मेरा बु . शिवारापर्यंत दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मेरा बु . शिवार ते मेरा फाटा या रस्त्याचे काम रेंगाळत पडले आहे. दोन कि.मी.पर्यंत मोठे खड्डे या मार्गावर आहे. त्यात पाणी साचल्यामुळे या मार्गावरून वाहन चालविणेही जिकिरीचे झाले आहे.

--पेरणी उलटण्याची भीती--

साखरखेर्डा मंडळात अलीकडील काळात अवकाळी पद्धतीने पडलेल्या या पावसामुळे राताळी, शिंदी, सवडद, पिंपळगाव सोनारा, साखरखेर्डा, गुंज, वरोडी, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सायाळा, बाळसमुद्र, शेंदुर्जन, तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी केलेली सोयाबीनची पेरणी उलटण्याची भीती व्यक्त होत आहे.

-----

सवडद ते गजरखेड हा पूल वाहून गेला. पुलाचे काम तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना रस्ता मोकळा करून द्यावा.

(शिवाजी लहाने,

सरपंच, सवडद)

----

पावसामुळे पेरलेल सोयाबीन, मूग, उडिद उगवण्याची शक्यता नाही. मी सात एकरांवर पेरलेले बियाणे खापल्याने उगवले नाही. या पावसाने पुन्हा जमिनीला फटका बसला.

(मनोहर तुपकर,

शेतकरी)