शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 3:44 PM

देऊळगाव माळी, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, साखरखेर्डा आणि बिबी या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : परतीच्या पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली असून सहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पाडळी शिंदे येथे एकाचा मृत्यू झाला तर बिबी परिसरातील दोघेजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाच्या १९ दरवाजातून एक लाख सात हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत असून देऊळगाव मही नजीकचा पुल पाण्याखाली गेल्याने चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य काही मार्गही बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.देऊळगाव माळी, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, साखरखेर्डा आणि बिबी या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून मलकापूर पांग्रा येथे १४४ मिमी तर बिबी येथे १३५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणार शहरालगतच्या वझर आघाव, वडगाव तेजन, वडगाव सरद आणि दीपखेड लगतचे नदीवरील पुल वाहून गेल्याने लोणार शहराचा अन्य भागांशी जमिन मार्गे संपर्क तुटला आहे.खडकपूर्णा प्रकल्पातून २४ आॅक्टोबर नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून तो ८९ हजार ८२४ क्युसेकवर पोहोचला आहे. त्यामुळे देऊळगाव मही नजीकचा पूल पाण्याखाली गेल्याने चिखली-देऊळगाव राजा वाहतूक ठप्प झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचे १५ गेट एक मिटरने तर चार गेट अर्ध्यामिटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रसंगी येथे आपतकालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता महसूल विभाग सतर्क झाला आहे. पैनगंगा नदीला पुर आल्याने बुलडाणा-चिखली हा मार्ग बंद पडला आहे. सुलतानपूरनजीकही सितान्हाणी येथे पुराच्या पाण्यामुळे महामार्गाचा काही भाग खचून गेल्याने येथे ही वाहतूक ठप्प होती.

दीडशे सुड्या गेल्या वाहूनपैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी हे नदी पात्रालगत असलेल्या शेतात घुसल्याने मेहकर तालुक्यातील दादुल गव्हाण, गणपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या तयार शेतमालाच्या १५० सुड्या पैनगंगेत वाहून गेल्या आहेत. दरम्यान, मेहकर बायपासनजीकच्या पैनगंगा नदीच्या पुलावर ३२ मिनीटात ३५ शेतमालाच्या सुड्या वाहून गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस