बसफेरी सुरू करण्याची मागणी
मासरुळ : बुलडाणा मढमार्गे धाड ही सकाळी ७ वाजता बुलडाण्यावरून सुटणारी बस सुरू करण्याची मागणी हाेत आहे. ही बस बंद असल्याने मढ, गुम्मी, तराडखेड व परिसरातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
चांडाेळ : चांडाेळ ते सावळी रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठ माेठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.
रस्त्याचे काम संथगतीने, वाहनधारक त्रस्त
माेताळा : माेताळा ते नांदुरा रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी हाेत आहे.
बस स्थानक परिसरात वराहांचा मुक्तसंचार
बुलडाणा : बस स्थानक परिसरात वराहांचा मुक्तसंचार असल्याने, प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वराहांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
निमगाव वायाळ येथे वृक्षाराेपण
दुसरबीड : येथून जवळच असलेल्या निमगाव वायाळ येथे कृषी दूतांकडून वृक्षाराेपण करण्यात आले. यावेळी सत्यनारायण उद्धवराव वायाळ व इतर ग्रामस्थ उपस्थित हाेते. यावेळी वृक्षाराेपणाविषयी वायाळ यांनी मार्गदर्शन केले.
ब्राह्मणवाडा धरणाच्या भिंतीवर झुडुपे वाढली
अमडापूर : येथून जवळच असलेल्या ब्राह्मणवाडा धरणाच्या भिंतीवर काटेरी झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे धरणाची सुरक्षितता धाेक्यात आली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. धरणाच्या भिंतीवरील काटेरी झुडुपे ताेडण्याची मागणी हाेत आहे.