मेहकर ते औरंगाबाद या महामार्ग क्रमांक १२वर खडकपूर्णा नदीवरील ऐतिहासिक पुलाची दयनीय अवस्था झाली आहे़ त्यामुळे नवीन पुलासाठी १० काेटी रुपये मंजूर मिळाले आहेत़ त्या नवीन पुलाच्या कामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे़ त्यामुळे तढेगाव फाट्याजवळ व राहेरीलगतच मोठी लोखंडी मजबूत कमान राज्यमार्गावर बसविण्यात आली आहे़ या कमानीतून केवळ लहान वाहनेच जाऊ शकणार आहेत़
नवीन पुलाचे काम सुरू झाल्याने राज्य महामार्गावरून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे़ या महामार्गाला वरून जाण्यासाठी जालनावरून देऊळगाव राजा, देऊळगाव मही, चिखली व मेहकर हा अवजड वाहनांना पर्यायी रस्ता आहे़ तसेच नागपूरकडून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी मेकर चिखली, देऊळगाव मही, देवळगावराजा राजा, जालना, औरंगाबाद हा पर्यायी रस्ता आहे़ जवळपास या पर्यायी रस्त्याचे वाढलेले अंतर ४५ ते ५० किलोमीटरनी वाढले आहे़