लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : सर्पदंशाने पिडीत सोनाली बोरकरच्या उपचारासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करून मानवतेचा परिचय दिला आहे.येथील भिमनगरमध्ये वास्तव्यास असलेली सोनाली एकनाथ बोरकर येथील विवेकानंद विद्या मंदिराची विद्यार्थीनी आहे. सोनाली बोरकर हिची आर्थिक परिस्थिती हलाखिची असून, तिला सर्पदंश झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कुटुंबीयांकडे उपचारासाठी पैसे नसल्याने तिच्या मैत्रिणींनी पैसे गोळा करून तिला मदत दिली. लोकमतने हे वृत्त प्रकाशित करताच अनेक मदतीचे हात पुढे आले. तालुका कृषी अधिकारी मेहकर यांच्यावतीने व महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने सोनालीच्या उपचारासाठी मदत निधी दिला.समाजामध्ये अनेकजण विविध संकटांना तोंड देत आयुष्य जगतात. अशाच संकटात सापडलेल्या बोरकर कुटूंबियांना समाजातील घटकांनी मदतीचा हात देवून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले आहे.- संतोष काकडे, तहसिलदार मेहकर.