चिखली : कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या व त्यांना लागणारा ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता लोकसहभागातून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प माजी आ. राहुल बोंद्रे यांनी हाती घेतला आहे. यानुषंगाने समाजातील दानशूरांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत शहर काँग्रेस व नगरसेवकांनी दीड लक्ष रुपयांचे २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संच दिले आहेत.
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे डेडिकेटेड कोविड सेंटर प्रकल्प उभारणीकरिता शहरातील गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी भरीव आर्थिक मदत केली आहे.
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे डेडिकेटेड कोविड सेंटर व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला शहरासह परिसरातील अनेकांचे हात पुढे सरसावले आहेत. यात चिखली गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने राहुल बोंद्रे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द केले आहेत. यात प्रामुख्याने परमेश्वर सोळंकी ११ हजार, बाबूसिंग महाराज ५ हजार, संदीप श्रीवास्तव २१ हजार, गजानन ठाकूर ५ हजार, राजू मातकर व दिनू भोजवाणी ३१००, तर विशेष योगदान म्हणून दोन निनावी दात्यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत दिली आहेत. तर यापूर्वी राजू खरात १ लक्ष, कन्हैया भोजवाणी २५ हजार, पप्पू वाधवाणी २५ हजार, भागचंदसेठ भोजवाणी २५ हजार, वसंत पटेल ११ हजार, राजू झाडगे ३१०० रुपये याप्रमाणे मदत दिली आहे. दरम्यान शहर काँग्रेस कमिटीस काँग्रेस नगरसेवकांनी सुद्धा पुढाकार घेतला असून दीड लक्ष रुपयांचे २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संच राहुल बोंद्रेंकडे सुपुर्द केले आहेत. यावेळी शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, न.प. गटनेते मो. आसीफ, नगरसेवक रफिक कुरेशी दीपक खरात, गोकुळ शिंगणे, हाजी रऊफ, विजय गाडेकर, विलास कंटुले, राजू रज्जाक, सुनील कासारे, आमीन खॉ, डॉ.मो. इसरार, प्रशांत देशमुख, खलील बागवान, सुरेश देशमुख यांची उपस्थिती होती.