कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे डेडिकेटेड कोविड सेंटरचा शुभारंभ व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते झाले. यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लोकसहभागातून उभारण्यात येणार असल्याचे राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट करून मदतीचे आवाहन केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत अनुराधा परिवाराच्या प्रत्येक उपक्रमाच्या पाठिशी सातत्याने उभे राहणारे शाम उमाळकर यांनी सत्यजित अर्बनच्यावतीने २५ हजार, तर प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. अनुराधा फार्मसीच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या जि.प.अध्यक्षा मनिषा पवार यांनी त्यांच्या ५ महिन्याचे मानधन म्हणजेच एक लक्ष रुपये मदत म्हणून जाहीर केले. यासह समता नागरी सहकारी पतसंस्था, राजेश खरात, अनुराधा सॅनिटायझर सेंटर यांनी प्रत्येकी एक लाख, तर बसवेश्वर सह.पतसंस्थेचे शैलेश आय्या यांनी ५० हजार, वसंत पटेल ११ हजार, आर.बी.फिटनेस क्लबचे तुषार बोंद्रे २१ हजार आणि छत्रपती हॉटेलचे संचालक देवीदास लोखंडे यांनी ५ हजार या प्रमाणे मदत जाहीर केली. यासह डॉ. मदन खरात यांची सुकन्या किरण खरात हिने ११ हजार जाहीर केले. राहुल बोंद्रे व त्यांचे कट्टर राजकीय प्रतिद्वंदी असलेले प्रा.नरेंद्र खेडेकर हे कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये माणुसकीच्या नात्याने एकत्र येताना दिसून आले. या प्रकल्पाला प्रा.खेडेकर तसेच श्याम उमाळकर यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन राहुल बोंद्रे यांनी हाती घेतलेल्या ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे. या पवित्र राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग म्हणून मी पाच महिन्यांचे मानधन १ लक्ष रुपये या प्रकल्पाला दिले आहे.
मनिषा पवार
जि.प.अध्यक्षा, बुलडाणा.