मोताळा : तळणी परिसरातून अपहरण केलेल्या तरुणाला सिल्लोड तालुक्यातील जंगलातील दरीत ढकलून दिल्याची कबुली अटक केलेल्या दोघा आरोपींनी बोराखेडी पोलिसांना दिली. यावरून बुधवार ८ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिसांनी सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. समाधान नाजूकराव अवसरमोल (२६) यांनी ४ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली होती की, फिर्यादी व त्यांचा मावसभाऊ प्रवीण सुभाष बैलम (२४, दोघे रा. पद्मावती ता. भोकरदन जि. जालना) हे दोघे जण मोताळा तालुक्यातील तळणी शिवारात पाझर तलावाच्या कामावर पोकलँड ऑपरेटर होते. दरम्यान, ३0 ऑक्टोबर रोजी दयानंद माणिक शेवाळे (३५) व शरद दिलीप पवार (२२, दोघे रा. पद्मावती ता. भोकरदन, जि. जालना) यांनी प्रवीण सुभाष बैलम यास नवीन पोकलँडची ट्रायल घ्यायची असल्याचे सांगितले व त्याला दुचाकीवर बसवून डांबून ठेवले आहे. प्रवीण बैलम याने रागातून उपरोक्त दोघांनी संगनमत करून त्याचे अपहरण केल्याचे म्हटले होते.
अपहरण करून तरुणास दरीत ढकलले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:19 AM
मोताळा : तळणी परिसरातून अपहरण केलेल्या तरुणाला सिल्लोड तालुक्यातील जंगलातील दरीत ढकलून दिल्याची कबुली अटक केलेल्या दोघा आरोपींनी बोराखेडी पोलिसांना दिली. बोराखेडी पोलिसांनी पाहणी केली असता, तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
ठळक मुद्देतळणी परिसरातून अपहरण केलेल्या तरुणाला सिल्लोड तालुक्यातील जंगलातील दरीत ढकलले! दोघा आरोपींनी अटक