बुलडाणा : जिल्ह्यातील ८७० पैकी ४३६ जागांसाठी महिला आरक्षण साेडत २९ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण कायम राहिल्याने अनेकांचा हिरमाेड झाला. आता सरपंच निवडीच्या हालचालींना वेग येणार आहे.
जिल्ह्यातील ४३६ ग्रामपंचायत सरपंचपदासाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले.
आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसीलदार रुपेश खंडारे आदी उपस्थित होते तसेच तालुकानिहाय महिलांचे आरक्षण संबंधित तालुक्याचे तहसीलदारांनी चिठ्ठीद्वारे काढले. बुलडाणा तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या १२ पैकी ६ महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं ३ पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा. पं १८ पैकी ९ महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण ३३ पैकी १७ ग्रा.पं महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. चिखली तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण २१ पैकी ११ महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं ३ पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं २७ पैकी १३ महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण ४८ पैकी २४ ग्रा.पं महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. मेहकर तालुक्यात अनुसुचीत जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या २६ पैकी १३ महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा. पं. ६ पैकी ३ महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा. पं. २६ पैकी १३ महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण ४५ पैकी २३ ग्रा. पं. महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. लोणारमध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण ११ पैकी ६ महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा. पं. २ पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा. पं. १६ पैकी ८ महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण ३१ पैकी १६ ग्रा. पं. महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. सिं. राजा तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण १८ पैकी ९ महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं १ पैकी एक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा. पं. २२ पैकी ११ महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण ३९ पैकी २० ग्रा. पं. महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. दे. राजा तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण ११ पैकी ५ महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं १ पैकी निरंक महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं १३ पैकी ६ महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण २३ पैकी ११ ग्रा.पं महिलांसाठी राखीव आहेत. मोताळा तालुक्यात अनुसूचित जाती प्रवर्ग एकूण ११ पैकी ६ महिला, अनुसूचित जमाती एकूण ग्रा.पं ६ पैकी ३ महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ग्रा.पं १८ पैकी ९ महिला, सर्वसाधारण प्रवर्ग एकूण ३१ पैकी १५ ग्रा.पं महिलांसाठी राखीव आहेत.