मोताळा (जि. बुलडाणा): बोरखेडी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या तळणी येथील रहिवासी संजय समाधान कठाडे (वय ४0) या इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार, ४ जुलै रोजी दुपारदरम्यान उघडकीस आली. संजय कठाडे या इसमाने स्वत:च्या घरात ३ जुलैच्या दुपारदरम्यान विष प्राशन केले. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व दोन मुली आहेत. आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
विष प्राशन करून इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2016 1:03 AM