दुसरीकडे इंडो-नेपाळ चॅम्पियनशिमध्ये बुलडाण्याच्या मुलांनी चांगलीच झेप घेतली. कबड्डीत तीन तर धावण्याच्या शर्यतीत एक सुवर्णपदक मुलांनी मिळविले. सोबतच गोळाफेकमध्ये रजतपदक मिळविले. २० ते २३ जानेवारीदरम्यान या स्पर्धा झाल्या होत्या. ही चांगली कामगिरी असली तरी २०२० हे पायाभूत सुविधांच्या दृष्टीने काहीसे नरमच राहले.
व्यायामशाळा अनुदानाचा कथित स्तरावर गैरवापर केल्या प्रकरणी जिल्ह्यातील २० व्यायामशाळांना नोटीस बजावली गेली होती. व्यायामाचे साहित्य व निकषानुसार न केल्या गेलेल्या बांधकामामुळे जिल्ह्यातील व्यायामशाळा क्रीडा विभागाच्या रडारवर आल्या होत्या. अमरावती आयुक्त कार्यालयातील एका पथकाने २०१६ दरम्यान वाटप केलेल्या व्यायामशाळा अनुदानाच्या प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पडताळणीसाठी जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर काही व्यायामशाळांकडून दिलेल्या अनुदानाची वसुलीही करण्यात आली. दरम्यानच्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढला. शाळा बंद पडल्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांना ब्रेक मिळाला. परिणामी, क्रीडा सवलतीचे मिळणारे गुणही मुलांना मिळू शकले नाहीत. आता २०२१ मध्ये नव्या जाेमाने क्रीडा क्षेत्रात भरभराट होईल अशी अपेक्षा करू या.
(साक्षी हिवाळेचा फोटो ७ जानेवारी)